✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.20फेब्रुवारी):-भावसार युवा एकता महिला आघाडी व भावसार समाज महिला फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला घालून मानवंदना देण्यात आली महाराजांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
“हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा” त्यांच्या इच्छेची आज गरज निर्माण झालेली आहे व आज सर्व भारत वासियांचे स्वप्न आहे की भारत वर्षात हिंदवी स्वराज्य निर्माण होणे गरजेचे आहे. असे मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अध्यक्ष योगिता धानेवार, कमल आलो समाजसेवक सल्लागार, कोष्याध्यक्ष अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, नीलिमा पेटकर, वृंदा दखणे, गोपिका गायकवाड, ज्योती लांजेवार, सविता बारसागडे, योगिता मुधोळकर, मीनाक्षी अलोणे, अर्चना आलोने, आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.