✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.20,फेब्रुवारी):-:-समाज कल्याण विभाग चंद्रपूर अंतर्गत वस्तीगृह व समरसता मंच चंद्रपूर यांच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज दिनांक 19 फेब्रुवारीला 393 वी जयंती निमित्त मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात पार पडली. उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली आणि शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांनी केलेले पराक्रम हे विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे थोरवी लक्षात यावी याकरता उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित कोमल आक्केवार अधीक्षिका सेवादल मुलींचे वस्तीगृह, डॉ. नंदकिशोर मैंदळकर समरसता मंच जिल्हा संयोजक, राजाभाऊ पेटकर अधीक्षक चोखामेळामुळे मुलांचे वस्तीगृह, प्रशांत निब्रड अधीक्षक दर्पण मुलांचे वस्तीगृह, रूपा वाढई अधीक्षिका स्नेहा मुलींचे वस्तीगृह, पार्वती पुनवटकर अधिक्षिका चोखामेळा मुलींचे वस्तीगृह, गंगाधर गुरूनुले, स्वप्निल शेंडे, सचिन बरबटकर, कविता गुरनुले, सुभाष नरूले, पिंटू मुन, स्वप्निल सूत्र पवार, गौरव अक्केवार, गणेश कन्नाके, नितीन चांदेकर, मनोज ताटे, विनोद करमरकर, किशोर जम्पलवार, अथर्व अक्केवार, तसेच वस्तीगृहातील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.