Home महाराष्ट्र परभणी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा मेळाव्यात गंगाखेड येथील श्री सरस्वती विद्यालयाचे...

परभणी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा मेळाव्यात गंगाखेड येथील श्री सरस्वती विद्यालयाचे यश

146

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17फेब्रुवारी):-परभणी भारत स्काऊट अँड गाईड जिल्हा संस्था तसेच ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी, जिंतूर रोड परभणी या ठिकाणी अतिशय उत्साहात जिल्हा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक शिवसांब सोनटक्के, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के , सचिव शितल सोनटक्के, जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक विठ्ठल भुसारे, जिल्हा मुख्यालय आयुक्त उपेंद्र दुधगावकर व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्यात प्रदर्शन, शोभायात्रा, शेकोटी, संचलन, प्रथमोपचार, बिन भांड्यांचा स्वयंपाक, मानवी मनोरे, तंबू उभारणी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा अतिशय नियोजन पद्धतीने घेण्यात आल्या.

यामध्ये श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी दोन्ही गटांनी प्रदर्शन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. विद्यालयाच्या मुलींच्या गटाला संचलन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षक श्रीकांत दासरवड यांच्यासोबत समारोप प्रसंगी पुरस्कार स्वीकार केला. मेळाव्याचा समारोप खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी , ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. कीरण सोनटक्के , सचिव श्रीमती शितल सोनटक्के , सहायक समाज कल्याण आयुक्त श्रीमती गीता गुट्टे , प्रा. वामनराव मोरे , जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे , ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे , मुख्याध्यापक संघटनेचे विविध पदाधिकारी, औरंगाबाद विभागाच्या विभाग प्रभारी श्रीमती प्रिया अधाने तसेच इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांशी हितगुज साधून विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या उत्कृष्ट स्काऊट व गाईड संघांना त्यांच्या हस्ते चॅम्पियन ट्रॉफी चे वितरण सुद्धा यावेळी करण्यात आले. सदरील मेळाव्यात जिल्ह्यातील जवळपास 900 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या मेळाव्याचा आनंद घेतला. या मेळाव्याला भेट दिलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांनी तंबूचे निरीक्षण करून स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मेळाव्याला ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. सदरील मेळावा आयोजनासाठी जिल्हा मुख्यालय आयुक्त स्काऊट उपेंद्र दुधगावकर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here