✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.16फेब्रुवारी):-15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल यांची 284 वी जयंती मोठ्या उत्साहात गेवराई तालुक्यातील जयराम नाईक तांडा येथे साजरा करण्यात आली बंजारा समाजाचे श्री संत सेवालाल महाराज हे जगातील प्रत्येक बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत. तर त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला. जगण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गात असणाऱ्या बंजारा समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला प्रगतीशील देशासोबत कसे चालता येईल याची शिकवण दिलेली आहे.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील जयराम तांडा येथे सात दिवस संत सेवालाल महाराज ग्रंथ वाचन कार्यक्रम यात जेमला महाराज,बापु रामराव महाराज,बामला लाल महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात व जिवन कार्य संदेश व कार्य सांगण्यात आले आला वाचक लक्ष्मण जाधव सुचक राठोड महाराज होते ह भ प विष्णुदास महाराज यांचे किर्तन व नंतर सुंदर राठोड यांच्या कडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बंजारा वेशभूषा करुन पारंपारिक नृत्य सादर करण्यात आले व संत सेवालाल महाराज पुजन जागर केला, बंजारा बोली भाषा वेशभूषा जतन करुन संस्कृतीच दर्शन घडवले यामध्ये सरपंच विष्णू रामभाऊ राठोड यांनी विशेष पुढाकार घेऊन सात दिवस धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली बंजारा भजन गाणे नृत्य करत ग्रंथ दिंडी मिरवणूक संपन्न झाली