🔹महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ सारखा सामाजिक जाणीवा व संवेदना असलेला पुन्हा कवी होणे नाही-सुखदेव तात्या सोनवणे
✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.16फेब्रुवारी):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने महाकवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त विशेष काव्यमैफलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सामाजिक परिवर्तन काव्यमैफलमध्ये सर्वांना खुला, मुक्तप्रवेश होता. या काव्यमैफलमध्ये सामाजिक परिवर्तनाच्या कवितांचे बहारदार सादरीकरण झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित पॅंथर महाराष्टप्रदेश अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.राजेंद्र सोनवणे, अरुण थोरात, गझलकार रामदास घुगंटकर, गोरक्षनाथ सोनवणे, सीमा गांधी, कल्पना बंब, अशोक सोनवणे, रामदास हिंगे, प्रशांत निकम, अशोक वाघमारे, शोभा जोशी, संभाजी रणशिंग इ.मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सुखदेव तात्या सोनवणे म्हणाले की,”महाराष्टात,भारतात नव्हे तर जगभर त्यांच्या साहित्याची, कवितेची चर्चा होते. सामाजिक भान, जाण, संवेदना असलेला पदमश्रीच्या पुढील उंचीचा हा महाकवी होता. समाजातील परिवर्तनाचा लढा त्यांनी आयुष्यभर दिला. राजकारणाबरोबर सांस्कृतिक, साहित्य आणि काव्य, सामाजिक,उ पेक्षित पद दलित वर्गाचा आवाज असणारे मोठे व्यक्तिमत्व होते.साहित्याचे मापदंड मोडून टाकणारे त्यांचे साहित्य निर्माण केले.समाजासाठी लढा देणारा एक लढा देणारा महान सेनानी होते.”यावेळी खुली सामाजिक परिवर्तन काव्यमैफल झाली.यात अनेक कवी कवयिञींनी काव्यरचना सादर करुन मैफलीत रंग भरला.नक्षञाचं देणं काव्यमंचच्या माध्यमातुन अनेक कवी कवयिञींना व्यासपीठ मिळाले.अनेक जण या व्यासपीठावर घडून पुढे गेलेले आहेत.काव्यक्षेञात भरीव कार्य करणारी महाराष्टातील कार्यक्षम संस्था आहे.
यावेळी सर्व सहभागींना पदमश्री महाकवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त उत्तम काव्यसादर केल्याबद्दल कवी कवयिञींचा सन्मानपञ,पुष्प देऊन गौरविण्यात आले.तसेच दुपारच्या सञात “संपूर्ण भारतातील पर्यटन”विषयी माहिती व पर्यटनाच्या विविध ठिकाणी जाणा-या स्थळांची माहितीचे मार्गदर्शन पर्यटन तज्ञ अरुण थोरात यांनी केले.हि सामाजिक परिवर्तन काव्यमैफल पैस रंगमंच ,चिंचवड,पुणे येथे संपन्न झाली या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी केले.
उपस्थितांचे आभार अशोक सोनवणे यांनी मानले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.चार तास हा कार्यक्रम रंगला.