✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.13फेब्रुवारी):-पंचायत समिती दर्यापूर जि. अमरावतीच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री सौ. वनिताताई गावंडे अकोला तर प्रमुख उपस्थिती कला फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत नारायणराव दामले (हास्य विनोद कलावंत) डॉ. जाधव कोल्हापूर, भीमराव खंडारे, गणेश साखरे यांची उपस्थिती होती. पुरस्कार वितरण करण्याचे हे सहावे वर्ष आहे.
यावेळेस महाराष्ट्रातून 28 लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना देण्यात आला. कला फाउंडेशनचे संचालक नेहमी वृक्षारोपण बेटी बचाव पक्षाला अभय विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळेत हास्यविनोद कार्यक्रम करतात त्यांनी हा पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रातून प्रस्ताव मागविले होते. त्याप्रमाणे उमरखेड येथील भगवतीदेवी विद्यालय, देवसरी चे दिगंबर माने शिक्षक यांची संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यापूर्वीसुद्धा डॉ. विजयराव माने यांनी त्यांना सत्यशोधक भाऊसाहेब माने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
व अखिल भारतीय मराठी संघाने त्यांना ऑनलाईन पुरस्कार देऊन सन्मानित केले. दिवसेंदिवस दिगंबर मानेसर यांची उंची वाढत आहे. मानेसर हे नेहमी विद्यार्थ्यांना उपयोगी होतील असे विद्यालयात उपक्रम राबवत असतात ते नेहमी बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरोग्यासाठी प्रकाश आमटे हेमलकसा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तसेच संतोष गर्जे यांच्या अनाथ मुलांसाठी बालग्राम गेवराई जि.बीड विद्यार्थ्यां मार्फत राखी व शुभेच्छापत्र पाठवत असून ते सेवाभावी संस्थेसी विद्यार्थ्यांना जोडत असतात. या वर्षीपासून विद्यालयात चालता बोलता कार्यक्रम चालू केला. त्यामुळे विद्यार्थी सामान्य ज्ञानमध्ये एक वेगळी झेप घेत आहेत. हा उमरखेड परिसरात या कार्यक्रमाचा वेगळा ठसा उमटला आहे.
तर आतापर्यंत विद्यालयात त्यांनी सात हस्तलिखित तयार केले आहेत. व वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आपले लेखन प्रकाशित करतात. विद्यालयात झाडे लावणे, कला फाउंडेशन संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यालयातील मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे, शिक्षकवृंद गौतम वाठोरे, शेख सत्तार, गणेश शिंदे, राजेश सुरोशे, अनिल अल्लडवार, सौ. मीनाताई कदम, भागवत कबले, पांडुरंग शिरफुले, अरविंद चेपुरवार, भागवत जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.