Home Breaking News गेवराई शहरातील तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

गेवराई शहरातील तरुणाच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल

198

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.13फेब्रुवारी):-शहरातील संजयनगर भागातील एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना शुक्रवार (दि.१०) घडली. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आज (दि.१२) बालाजी काळे (रा.सिरसाळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत कल्याण पैठणे (वय ३३, रा. संजयनगर, गेवराई) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भागवत पैठणे टॅम्पो चालवून आपली उपजीविका चालवितो. शुक्रवारी राहत्या घरासमोर बालाजी काळे आला. आणि तुमचा टेम्पो भाड्याने पाहिजे असे त्यांने भागवतला सांगितले. त्यानंतर बालाजी टेम्पोतून भागवतसोबत निघून गेला.

दरम्यान, खूप उशीर झाल्याने भागवतला घरच्यांनी संपर्क केला असता त्याच्या मोबाईलवर दुसरीच व्यक्ती बोलत होती. त्यामुळे भागवतचे अपहरण झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बालाजी काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here