Home महाराष्ट्र खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम

खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम

149

🔸उपाध्यक्षपदी सचिन सुकटे, इम्रान जमादार तर सचिवपदी नितीन राऊत

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

सातारा(दि.12फेब्रुवारी):-जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांची तर उपाध्यक्षपदी औंध प्रतिनिधी सचिन सुकटे ( सर ) आणि इम्रान जमादार यांची निवड करण्यात आली. सचिव पदी जेष्ठ पत्रकार नितीन राऊत, सहसचिवपदी विशाल सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल नलवडे, दिपक नामदे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार विनायक भिसे, अजित जगताप तर प्रसिद्धी प्रमुख पदी ऋषिकेश पवार यांचीसर्वानुमते निवड करण्यात आली.

वडूज येथील समर्थ करियर ॲकॅडमी येथे शनिवारी झालेल्या बैठकीत पत्रकार फिरोज मुलाणी ( सर ), विलासराव आपटे, पद्मनील कणसे, रशिद शेख, सर्फराज बागवान, केदार जोशी, निसारभाई शिकलगार, दिपक नामदे, सतीश डोंगरे, सौरभ चव्हाण, विठ्ठल नलवडे, खलील मुलाणी, दत्ता कोळी, सचिन साळुंखे, निहाल मणेर, नितीन घोरपडे, अकबर भालदार, मोहसिन मुल्ला, दत्तात्रेय जाधव, नदीम शिकलगार, मंगेश भिसे, इम्रान जामदार, एकनाथ जाधव, अविनाश काशीद, विशाल चव्हाण, विनोद लोहार, अतुल पवार, अमोल भिसे उपस्थित होते. दूरध्वनीवरुन तसेच लेखी अर्ज देवून नाजीम मुल्ला , संतोष साळुंखे, प्रशांत जाधव, पंकज कदम, विलास कुलकर्णी, नितीन राजे, केशव कचरे या पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेचे सदस्यत्व स्विकारले.

नूतन अध्यक्ष अविनाश कदम यांनी जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे
शरद काटकर, सातारा शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, सचिव दिपक प्रभावळकर, दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आलेले सर्व पत्रकार खटाव तालुक्यातील पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा पुढेही जोमाने सुरु ठेवतील अशी ग्वाही दिली. मार्गदर्शक प्रा. दिलीप पुस्तके, विनय भिसे, पांडुरंग तारळेकर, अजित जगताप यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात फिरोज मुलाणी यांनी मराठी पत्रकार परिषदेचे आजपर्यंतचे कार्य सांगून पत्रकारांच्या पाठिशी एकसंघपणे सर्वजण खंबीरपणे उभे रहातील अशी ग्वाही दिली.जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके, विनय भिसे, अजित जगताप, सचिन सुकटे, पांडुरंग तारळेकर, विलासराव आपटे यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारितेतील आव्हाने, जबाबदारी आणि कर्तव्ये याविषयी मते मांडली. आभार दत्ता कोळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here