✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 7 फेब्रुवारी):-गेल्या अनेक दिवसापासून उमरखेड तालुक्यामध्ये रेती परवाना नसल्या कारणामुळे बांधकाम धारकापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
बांधकाम पूर्ण करण्यासाठी रेतीची आवश्यकता असल्यामुळे अव्वाच्या सव्वा दरात अरे तिथेच करामार्फत रेती विकल्या जाते.
यामध्ये श्रीमंत वर्ग काळ्या मार्गाने आलेली रेती ज्यादा दरात घेऊ शकतो परंतु ज्यांना शासनामार्फत घरकुल मंजूर झाले त्यांचे काय नुकतेच पंचायत समिती विभागामार्फत घरकुल बांधकाम धारकांना 31 मार्च चा अल्टीमेटम दिलेला आहे.
31 मार्च च्या आत बांधकाम पूर्ण न केल्यास घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुला पासून वंचित राहावे लागेल अशा स्वरूपाच्या सूचना घरकुला लाभार्थ्यांना दिल्या आहेत त्यामध्ये रितसर रेती मिळत नसल्यामुळे बांधकाम कसे पूर्ण करणार हा घरकुल लाभार्थ्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरकुल चा निधी परत गेला तर गरिबांच्या घरांचे स्वप्न बघणार की काय असा पेच निर्माण झाला आहे. म्हणून तालुक्यातील ठराविक रेती पेंड मोकळे करून घरकुल लाभार्थ्यांना अल्प दरात रेती पुरवठा करण्यात यावा.
व अवैध रेती व्यवसायिकावर कारवाई करून होणारी रेतीची तस्करी थांबवावी अशा स्वरूपाचे निवेदन तहसीलदार उमरखेड यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले.
रेतीच्या कमतरतेमुळे घरकुल लाभार्थ्यांचे पैसे परत गेल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील अशा स्वरूपाचा इशारा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे, तालुका महासचिव देवानंद पाईकराव, मार्शल विनोद बरडे, शंकर सूळ, गणेश मुरमुरे, देवराव मुरमुरे, श्यामभाऊ धुळे, मोसीन पठाण, सादिक नोमन, यांची उपस्थिती होते.