Home महाराष्ट्र शहीद भगतसिंग शाळेमध्ये “वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात साजरा

शहीद भगतसिंग शाळेमध्ये “वार्षिक स्नेहसंमेलन” उत्साहात साजरा

175

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 4 फेब्रुवारी):-शहरातील शहीद भगतसिंग नगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे “वार्षिक स्नेहसंमेलन” दिनांक 31 जानेवारी पासून कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कला व क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला दर्शनवाड साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, उमरखेड) होते.
यामध्ये कबड्डी , खोखो लंगडी, स्लो सायकल, लिबु चमचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व इतर सांघिक खेळ चित्रकला स्पर्धा तसेच आनंद मेळावा चे आयोजन करण्यात आले होते.

याचे उद्घाटक म्हणून गोरे मॅडम (प्रशासन अधिकारी उमरखेड) हे होत्या.

त्यानंतर संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे उद्घाटक महेश जामनोर साहेब (न.प मुख्यापक, उमरखेड) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बावनगावे सर, राहत अन्सारी सर, आडे सर मुख्यध्यपक, सौ. गायकवाड मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नरवाडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

या सर्व मान्यवरांचे शाळेच्या शिक्षक मंडळीच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंग, माता सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार व दीप प्रज्वलीत करून करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये डान्स स्पर्धेचे आयोजन प्रामुख्याने करण्यात आले होते.या डान्स स्पर्धेमध्ये एकूण 23 ग्रुप डान्स अतिशय सुंदर असे सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक पालिका प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सर्व कार्यक्रम यशस्वी करणयासाठी आशिष राठोड सर (मुख्याध्यापक), सूर्यवंशी सर, कोरडे सर, चौधरी सर, राजे सर, मुटकुळे सर, गिरी सर, मेंटकर सर, लोमटे सर तसेच बोके मॅडम, पवार मॅडम, नरवाडे मॅडम, नंदनवार मॅडम, शिंदे मॅडम, पोंगाणे मॅडम, शिंदे मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री साबळे भाऊ, पाईकराव बाई, वाढवे बाई व टेंभरे बाई यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री सोनेवार मॅडम व सुनील कवडे सर यांनी केले तर आभार बुरकुले सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here