Home गडचिरोली सावधान!! कर्करोगाचे आहेत 200 प्रकार??

सावधान!! कर्करोगाचे आहेत 200 प्रकार??

114

🔹बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाची झपाट्याने वाढ

🔸 डॉ स्वप्नील अग्रवाल यांचे मौलिक मार्गदर्शन

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.3फेब्रुवारी):-देशात कर्करोगांचे जवळपास 200 प्रकार असून कर्करोगांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मानवी जीवनातील बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, बदलती जेवणाची पद्धती, वंध्यत्व आणि वाढते व्यसन या सर्व बाबी कर्करोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई चे कर्करोग तज्ञ डॉ. स्वप्नील अग्रवाल यांनी लायन्स क्लब गडचिरोली आणि गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट केअर क्लिनिक येथे आयोजित मोफत कॅन्सर रोगनिदान व मार्गदर्शन शिबिरात उपस्थिताना महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

यावेळी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पद्मावार, विद्यमान अध्यक्ष डॉ. सविता सादमवार, सचिव महेश बोरेवार, कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार, केमिस्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन नागपूर झोनचे अध्यक्ष सुरेश सारडा, जिल्हाध्यक्ष देवेंद्र सोमनकर, सदस्य राजेश ईटणकर, गायत्री सोमनकर, रमाकांत तिवारी, डॉ सुरेश लडके, शेषराव येलेकर, शांतीलाल सेता, गिरीश कुकुडपवार, सुनील देशमुख, निलिमा देशमुख तसेच शहरातील व आजूबाजूच्या तालुक्यातून आलेले शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.अग्रवाल पुढे म्हणाले की, आज विज्ञानामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचारांमध्ये प्रगती केली असून अनेक अद्यावत पद्धतींचा वापर केला जात आहे.

कर्करोगाचे रोगनिदान लवकरात लवकर होणे गरजेचे आहे त्यासाठी खास शिबिरे भरवून कर्करोगाविषयी माहिती त्याचे निदान व उपचार याविषयी प्रचार प्रसार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगाचे निदान पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये झाल्यास आणि वेळेत उपचार सुरू केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी 45 रुग्णांची तपासणी केली त्यातून 12 रुग्णांमध्ये कर्करोगाची संभाव्य लक्षणे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण निदानासाठी कर्करोगाच्या इतर चाचण्या करून घेण्याचे रुग्णांना सांगण्यात आले असून पूर्ण निदान होऊन कर्करोग झाल्याचे निश्चित झाल्यानंतर अशा रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी चामोर्शी तालुक्यातील मालेरमाल या गावचे रुग्ण खुशाल पत्रुजी कावळे यांनी डॉ. अग्रवाल यांच्या उपचारामुळे चौथ्या स्टेजमध्ये असलेला मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले.या शिबिरासाठी दंतरोग तज्ञ डॉ शर्वरी इटणकर, डॉ साक्षी साळवे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर आयोजित करण्यासाठी स्मार्ट केअर फार्मसी च्या संचालिका गायत्री सोमनकर, सुरेश लडके, मदन जिवानी, प्रा. देवानंद कामडी, शेषराव येलेकर, सतीश पवार, नितीन चेंबूलवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here