Home महाराष्ट्र उमरखेड येथे 3 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पीछडावर्ग मोर्चाची राज्यव्यापी परिवर्तन यात्रा धडकणार

उमरखेड येथे 3 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पीछडावर्ग मोर्चाची राज्यव्यापी परिवर्तन यात्रा धडकणार

113

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 2 फेब्रुवारी):-ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी स्थापित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चाची राज्यव्यापी परिवर्तन यात्रा मागील 21 जानेवारी रोजी नागपूर येथून सुरू झाली असून ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाजात जागृती निर्माण करीत भ्रमण करणार आहे त्याच अनुषंगाने 3 फेब्रुवारी रोजी उमरखेड मध्ये दाखल होत आहे.

सदर यात्रा उमरखेड शहरांमध्ये दाखल झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जमणार असून त्यानंतर माहेश्वरी चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माहेश्वरी खुले नाट्यगृह येथे एका सभेमध्ये रुपांतरीत होणार आहे.

यासाठी तालुक्यातील बहुजन नेते उपस्थित राहणार असून सदरील सभेच्या उद्घाटक अॅड. मोहिनीताई इंद्रनील नाईक या उपस्थित राहणार आहेत सभेचे अध्यक्षस्थानी चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा, श्रीकांत ओहोळ प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती मोर्चा हे उपस्थित राहणार आहेत.

ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या व ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ईव्हीएम घोटाळ्याच्या विरोधात हा मोर्चा असून शेतकऱ्यांसाठी किमान हमीभाव कायदा करण्यात यावा तसेच 52 टक्के ओबीसींना 52 टक्के आरक्षण देण्यात यावे याशिवाय क्रिमिलेयर अट रद्द करण्यात यावी. तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसी वरील अत्याचारा विरोधात तर ओबीसीसाठी संरक्षण कायदा बनविण्यात यावा तसेच ओबीसी समाजासाठी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे व आरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी तसेच उच्च शिक्षण व्यवसायिक शिक्षण व तंत्रज्ञान शिक्षण निशुल्क करण्यात यावे.

याशिवाय प्राथमिक शिक्षणात बदल करून समान शिक्षण प्रणाली राबविण्यात यावी तसेच जमिनीचे सर्वांना समान वाटप करण्यात यावे आणि मागासवर्गीय समाजातील महापुरुषांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सामील करावा व केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ओबीसींना वेगळी तरतूद करून निधी वितरित करण्यात यावा व मंडल आयोगाच्या उर्वरित सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या या मागण्या करण्यात आल्या असुन सदर कार्यक्रमाला वर्षाताई शिवाजी देवसरकर हिंगोली लोकसभा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी व इतर अनेक बहुजन नेते उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here