🔸कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले
✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.30 जानेवारी):-माहेश्वरी खुले नाट्यगृह उमरखेड येथे भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त पाचवी महिला विश्व बौद्ध धम्म परिषद हजारोच्या जन समुदायामध्ये संपन्न कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10. वा भंते किर्ती बोधी, भन्ते महाथेरो, कमल धम्मो, गौतम रत्न, भन्ते दयानंद इत्यादींनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला धूपदीप तथा पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करत उपस्थीत भंतेजींनी त्रिशरण पंचशिल ग्रहण करून धम्मदेशनेला सुरूवात केली. व या बौध्द धम्म परिषदेचे व बौध्द धर्मा बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगून मार्गदर्शन केले.
तर सायंकाळी 6 वा बुध्द भीम गितांचा वैचारिक सामना भिमशाहीर भिमदास नाईक (नागपूर) आणि गायिका वंदना खोब्रागडे (कारंजा) यांचा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवदादा जमदाडे हे होते. व त्यांनी अध्यक्षीय भाषणा मध्ये भारतीय संविधान जिवंत राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहनराव मोरे सर,प्रकाश भस्मे, सिध्दार्थ दिवेकर (युवा पत्रकार), संतोष जोगदंडे (तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उमरखेड), मार्शल विनोद बरडे सर, रवींद्र वाकोडे, देवानंद पाईकराव, प्रफुल दिवेकर, सुनील चिंचोलकर, गजानन दामोदर सर, कैलास राऊत, शुद्धोधन दिवेकर जनार्दन जमदाडे इत्यादींचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.
या परिषदेचे आयोजन पंचफुलाबाई पाईकराव, ज्योत्सनाताई भालेराव, प्रभाकर पाईकराव, सुगात पाईकराव, संदीप अढागळे, सुभाष साळवे, निर्मलाबाई शिंगणकर,शांताबाई पडघने, उमाबाई थोरात (समता सैनिक दल) इतर महिला मंडल समिती यांनी केले होते.
या महिला विश्व बौद्ध धम्म परिषदेला बौद्ध उपासक, उपासिका, तरुण मंडळी समता सैनिक दल महागाव असे हजारोच्या संख्येने उपस्थित होते.