✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.27जानेवारी):-भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान : का वाचावे? का वाचवावे? या महत्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शनिवार दि. 28 जानेवारी, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लातूरचे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक जॉर्ज क्रुज उपस्थित राहणार आहेत.
लेखक व समीक्षक प्रा. डॉ. अमर कांबळे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आहेत.कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक अनिल म्हमाने व प्रकाशिका प्रा. डॉ. शोभा चाळके यांनी केले आहे.