✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.22जानेवारी):-मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय श्रीरामपूर पुसद येथे तीन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ या दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुसद तहसीलदार एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डी.पी.जगताप तर मुख्य अतिथी म्हणून गटविकास अधिकारी पं.स.पुसद संजय राठोड,तसेच प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी पं.स.पुसद हेमलता मोतुळे,प्राध्यापक शे.नईम, राधेश्यामजी जागींड,अनिता पावडे, डी.पी.देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन करून विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले.तसेच यावेळी खेळ, क्रीडा ,नवोदय , शिष्यवृत्ती सह विविध क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.पी .देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन के.डी.जाधव यांनी केले आभार प्रदर्शन कु. एस. जे. दोडल यांनी केले.
या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी ॲड. मोहिनीताई नाईक यांनी विद्यार्थ्यांची प्रगती व शिस्त उत्तम असून सर्व विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले तसेच वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.पी. जगताप व तसेच उपस्थित मान्यवर संजय कांबळे, गजानन होंडे ,संतोष पदमवार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती .तसेच यावेळी विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.