Home महाराष्ट्र कुंभारी येथे “राष्ट्रीय युवक दिना”चे औचित्य साधून संपूर्ण शरीर तपासणी शिबिर संपन्न

कुंभारी येथे “राष्ट्रीय युवक दिना”चे औचित्य साधून संपूर्ण शरीर तपासणी शिबिर संपन्न

104

✒️तालुका प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)

कुंभारी(दि.21जानेवारी):-मौजे कुंभारी (हनुमाननगर) येथे राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने कै.अंबीबाई बबन पवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संपूर्ण शरीर तपासणी शिबिर दि. 12/01/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मधुकर बंडू राठोड (पोलीस) प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष सौ. अर्चना दत्तात्रय पवार व प्रमुख मार्गदर्शक डॉ. संदीप सदावर्ते डॉ. स्वप्नपूर्ती जाधव उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्ता पवार यांनी केले. संपूर्ण शरीर तपासणी शिबिराच्या अनुषंगाने गावातील नागरिकांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच सरपंच सौ. अर्चना पवार यांनी संपूर्ण शरीर तपासणी शिबिरातून नागरिकांची रक्तगट तपासणी, शुगर व इतर अनेक आजारांवर उपाय सांगितले जातील व त्याचे निराकरण करण्यात येईल असे मत व्यक्त केले. या अनुषंगाने पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून अमूल्य वेळ देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यात सहभागी विध्यार्थी कु. साक्षी राठोड, आकाश जांभळे, पायल चव्हाण, प्रीती चव्हाण, कल्पना जगदाळे, अंकिता इंगोले, पल्लवी कदम, अंकिता राठोड, गाझिया नुरीवाले, अतुल राठोड, पुष्पराज रुणवाल, दानिश बेग, प्रमोद चव्हाण, आकाश चव्हाण, ऋषिकेश शिंदे, साहिल मेश्राम,रविराज मगरे, अष्टविनायक नरवाडे, या विद्यार्थ्यांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदविला. या संपूर्ण शरीर तपासणी शिबिराचा गावातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य श्री. ईश्वर जाधव यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here