✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.20जानेवारी):- मौजे पोखर्णी (वा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षातील झालेल्या सर्व बोगस कामाची चौकशी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांना निवेदन.
सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आह़े की मौजे पोखर्णी (वा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षामध्ये पेव्हर ब्लॉक, नाली बांधकाम, सिसी रस्ता हे कामे केल्याचे दाखविले आहे.
मात्र गावामध्ये एकही काम केलेले नसून केवळ बोगस कामे दाखवून सरपंच, ग्रामसेवक, यांनी सदरील कामाचे बिले उचलले आहे. तरी या कामाची चौकशी करुन संबंधीत दोषी अधिकारी, सरपंच, गुत्तेदार, ग्रामसेवक यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी असे शाम पंडित यांनी सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.