Home महाराष्ट्र वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण !….

वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगर मध्ये वृक्षारोपण !….

94

🔹झाडे लावा – झाडे जगवा – पर्यावरण वाचवा : बी.एम.सैंदाणे [ अध्यक्ष कृष्ण गीता नगर ]

🔸मान्यवरांना छत्रपती संभाजीराजे व महात्मा बळीराजा यांचा अनमोल ग्रंथ देऊन स्वागत !…

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.16जानेवारी):-शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वराज्याचे दाखले धनी – छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक पी. डी.पाटील यांनी केले.वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धरणगाव नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, वसुंधरा अभियानाचे सिटी कॉर्डिनेटर निलेश वाणी, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष विनोद रोकडे, सुप्रसिद्ध बिल्डर नवनीत चौधरी, शिवव्याख्याते तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील, कास्टट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार, आरोग्य कर्मचारी महेश चौधरी, सुखदेव पचेरवार उपस्थित होते.

आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे छत्रपती संभाजीराजे व सम्राट बळीराजा यांचे अनमोल ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी,कॉलनीवासी बंधू-भगिनीं व बाल – गोपालांच्या हस्ते कृष्ण गीता नगर ओपन स्पेस मध्ये लिंब, पिंपळ, चींच, वड असे विविध रोपांची लागवड करण्यात आली. नगरपरिषदेने १५ रोप, १५ ट्री गार्ड व खत पुरविले यासाठी निलेश वाणी यांनी खूप सहकार्य केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध बिल्डर नवनीत चौधरी व तेली समाज अध्यक्ष नितीन चौधरी यांनी प्रत्येकी दोन – दोन बाकडे, जे.एस. पवार व बी.एम.सैंदाणे यांनी प्रत्येकी एक बाकडा ओपन स्पेस मध्ये देऊ असे आश्वासन दिले.

याप्रसंगी कॉलनीतील अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक सोनुजी न्हावी, महेंद्र सैनी ( माळी ), जे एस पवार, एस एन कोळी, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, संजय सुतार, गोकुळ महाजन, वासुदेव न्हावी, पी.डी. पाटील, सुधाकर मोरे, संजय मिस्तरी तसेच कॉलनीतील माता – भगिनी व बालगोपाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here