✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.15जानेवारी):-तालुक्यातील बाभुळगाव येथे दरवर्षी प.पू. संत श्री माणिक स्वामी महाराज व प.पू. श्री दौलत स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रमाणे सप्ताहाची सुरुवात होत असते.प.पू. श्री माणिक स्वामी महाराज व प.पू. श्री दौलत स्वामी महाराज हे बाभुळगाव व परिसरातील भक्तांचे मोठ्या श्रध्देचे आराध्य दैवत आहे. 7 जानेवारी पासून अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सुरुवात झाली होती. या प्रसंगी किर्तन क्षेत्रात ज्येष्ठ, श्रेष्ठ, व दिग्गज असेल किर्तन कारानी संतांचे विचार,आचरण जनतेच्या मनात व मानवी जीवनात कसे आवश्यक ते पटवून देत, परिसर भक्तीमय व आनंदायी करून संत परंपरा ची महिमा घराघरात पोहोचली.
दि. 14 रोजी ह.भ.प. श्री. दिलीप महाराज बीडकर यांच्या काल्याच्या कीर्तनातून संतांचे श्रेष्ठ विचार लोकांपर्यंत पोहचवत अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची सांगता झाली. या प्रसंगी गावातील व परिसरातील सर्व मान्यवरांनी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे ऋण व आभार व्यक्त केले. सर्व गावकऱ्यांनी बाहेर गावाहून आलेले सर्व भजनी मंडळींचे व ह.भ.प. महाराजांचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नीलकंठ पाटील, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश भालेराव, रवी मोरे, ज्ञानेश्वर पाटील, चुडामन कोळी, दिलीप कोळी, विनोद पाटील,सुधीर पाटील व गावातील सर्व तरुण मित्र मंडळ उपस्थित होते. त्याच बरोबर गावकऱ्यांनी सर्व महारांचे सत्कार करून येणाऱ्या पुढील वर्षी अजून चांगल्या प्रकारे सप्ताह पार पाडू. असे एकमुखाने हरिनामाच्या जय घोषात सप्ताहाची सांगता झाली.