✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)
कराड(दि. १२ जानेवारी):-श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये दि. 12 जानेवारी 2023 रोजी, स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब जयंती निमित्त मा. प्रणय तानाजी सपकाळ यांचा, “विवेकानंद, तुम्ही, मी आणि भारत” या विषयावर मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता.
आज स्वामीजींची शिकवण आपणाला कशाप्रकारे उपयोगी आहे याची मुख्यत्वे चर्चा करण्यात आली. आपल्या मनाला पवित्र करणं हेच आजच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे आणि तरच समाज, भारत आणि संपूर्ण विश्व सुंदर होणार आहे हा एकूण चर्चेचा निष्कर्ष निघाला! या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी NCC विभागाने उत्तमरीत्या पार पाडली.
कार्यक्रमाची प्रस्तावना लेफ्ट. डॅा.महेंद्र कदम पाटील यांनी केली, कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य श्री. एल. जी. जाधव यांनी भूषवले होते, पाहुण्यांचा परिचय ज्युनियर अंडर ऑफिसर सोहेल मुलाणी यांनी करून दिला, तसेच कु. प्रेरणा गरुड यांनी आभार मानले. या कायक्रमासाठी सौ. स्वाती पाटील मॅडम व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.