Home महाराष्ट्र चाकण नंबर 2 शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुवर्ण गरुड झेप

चाकण नंबर 2 शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुवर्ण गरुड झेप

220

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि-14 फेब्रुवारी):-चाकण- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चाकण नंबर दोन शाळेने नेत्रदीपक कामगिरी करून शाळेची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. इयत्ता पाचवीचे अकरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले तर एक विद्यार्थिनी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली. ही परीक्षा जुलै 2022 मध्ये घेण्यात आली होती.

यामध्ये १) धनश्री अशोक थोरात(२७०),२) रुद्राणी भाऊसाहेब ननवरे(२६८), ३) हर्षदा जनार्दन महाजन(२६२), ४) आलिया इरफान पठाण(२५६),५) लावण्या जयकुमार चेट्टी(२५२), ६) मृणाली प्रभाकर राखोंडे (२४८),७) श्रावणी गणेश साखरे(२४४), ८) ईश्वरी किसन धंद्रे (२४२), ९) मृणाली अजित सुतार(२४२), १०) श्रावणी महेश गोयेकर(२३२), ११) वैष्णवी भगवान बनसोडे(२२८) या विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

त्यांना वर्गशिक्षिका सुजाता गायकवाड/ डेरे मॅडम, मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम व सहकारी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी जीवनजी कोकणे साहेब,विस्तार अधिकारी अशोक गोडसे साहेब,केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व पालक आदींनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here