Home महाराष्ट्र मालेवाडा येथे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन स्पर्धेला विविध पारितोषकांची मेजवानी प्रथम पारितोषिक...

मालेवाडा येथे भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन स्पर्धेला विविध पारितोषकांची मेजवानी प्रथम पारितोषिक 11000 रुपये

194

✒️विशेष प्रतिनिधी(उपक्षम रामटेके)

चिमूर(दि.12जानेवारी):-तालुक्यातील मालेवाडा येथे मित्रपरिवार क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, मा. मानका देवी च्या भव्य पटांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सात किलो वजनी गटातील पुरुषांचे हे सामने असणार असून एक दिवसीय असणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 550 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे व सामना चालू झाल्यानंतर एखाद्या संघाला तक्रार करायची असल्यास एक हजार रुपये तक्रार शुल्क असणार आहे.

या स्पर्धेला प्रथम, द्वितीय, तृतीय असे पुरस्कार असून, उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट ऑल राऊंडर, असे विविध पुरस्कार असणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सुनील नरुले मो. 8767397 612 रोहित ननावरे मो. 7499 501142 पवन ननावरे मो. 84 59237193 या मोबाईल वर संपर्क करायचा आहे. प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये असून द्वितीय पारितोषिक सात हजार तर तृतीय पारितोषिक 4000 रुपये असणार आहे.

या कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन राजू कापसे माजी प.स. सदस्य चिमूर यांच्या हस्ते होणार असून कालिदास भोयर सरपंच मालेवाडा, प्रवीण जीवतोडे तंटामुक्ती अध्यक्ष मालेवाडा, हेमंत गजभिये पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 19 जानेवारीला होणाऱ्या या स्पर्धेला जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा मित्रपरिवार क्रीडा मंडळ मालेवाडा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here