Home Breaking News उमरखेड पोलीसांनी लावला दुचाकी चोरीचा छडा

उमरखेड पोलीसांनी लावला दुचाकी चोरीचा छडा

274

[11 वाहनासह 2 आरोपी ताब्यात]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.11जानेवारी):-शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरी जाण्याचा प्रकार वारंवार घडत होता या प्रकरणाचा छडा लावण्यात उमरखेड पोलिसांना यश आले असून आज 11 चोरी गेलेल्या वाहनांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात उमरखेड पोलिसांना यश आले.

7 जानेवारी रोजी येथील फिर्यादी राहुल संतोष मेने वय 31 वर्ष यानी पोलिस स्टेशन ला येवुन जबानी रिपोर्ट दिला की, त्यांची दुचाकी वाहन 5 जानेवारी रोजी त्यांचे घरासमोरून स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल वाहन क्र . MH – 29 – X – 8970 अशी अज्ञात चोरटयाने चोरून नेलेली आहे अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची गुन्हयासंबंधाने पोलीस अधिक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधिक्षक पीयुष जगताप यांनी सदर गुन्हयातील आरोपी तसेच चोरी गेलेली मोटरसायकल हिचा तात्काळ शोध होणे करीता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी व ठाणेदार अमोल माळवे यांना सुचना दिल्या असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि . प्रशांत देशमुख , पोउपनि , अमोल राठोड व तपास पथक यांना सदर गुन्हयाचा तपास देण्यात आला तपास पथकाने तांत्रीक बाबींचा आधार घेवून आरोपी मोहम्मद सकलेन मोहम्मद अकील वय 21 वर्ष व शेख तौफीक शेख रशिद वय 21 वर्ष दोघेही राहणार रहीम नगर उमरखेड यांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन सदर गुन्हयातील चोरी गेलेली मोटरसायकल स्प्लेन्डर प्लस वाहन क्र. MH – 29 – X – 8970 हस्तगत करण्यात आली.

वरील गुन्हयाचे माहितीचे अनुषंगाने व त्यांचेच माहीतीच्या आधारे याआधी चोरी गेलेल्या व पोलीस स्टेशन ला फिर्याद दाखल झालेल्या होन्डा शाईन क्रमांक MH – 26 – BJ8125 दुचाकी वाहनाचा शोध सुरू केला असता संशयीत इसम अनुक्रमे नामे शेख अरबाज शेख जमीर वय 23 वर्ष, शेख तैमीर शेख समीर वय 23 वर्ष दोघेही राहणार उमरखेड यांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन उमरखेड परीसरातुन तसेच हदगांव, निवघा, हिमायतनगर व नांदेड येथुन चोरी गेलेल्या बीना नंबर बजाज प्लॅटीना स्प्लेन्डर प्रो, यामाहा RX – 100 होन्डा युनीकॉर्न पेंशन प्रो यामाहा दुचाकी , स्प्लेन्डर दुचाकी क्रमांक MH – 29 – k3831 स्प्लेन्डर प्लस दुचाकी कमांक MH – 26 – y6890 , हिरो होण्डा सी . डी 100 MH – 31 AM -0365 ऍक्टीवा दुचाकी क MH – 26 – BT – 8749 अशा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

सदरची दुचाकी वाहनांचे बाबतीत कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत या बाबत तसेच स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी गेलेल्या वाहनांचे बाबतीत पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही .पोलीस अधिक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधिक्षक पीयुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी, पो.नि. अमोल माळवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रशांत देशमुख , पो.उपनि.अमोल राठोड, हवा.दयानंद जांभळे, पो . ना . संदिप ठाकुर, कैलास नेवकर, नरेंद्र पुंड,अतुल तागडे, रामदास इंगळे, संतोष राठोड, दत्ता हिंगाडे पोलीस अंमलदार सुर्यकांत गीते, सुदर्शन जाधव, हिम्मत बंडगर, नितेश लांडे, अनिल पवार, दादाराव मीरासे, नितीन खवडे यांनी यशस्वी रित्या पार पाडलेली असून यामुळे ज्या नागरिकांचे वाहन चोरीला गेले होते त्यांना वाहन मिळण्याची आशा बळावली असून गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here