


✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.11जानेवारी):- चि. धनंजय दिगंबर माने (एम.ए. इंग्रजी) बोरी (चा.)तथा युवा उद्योजक यांना बोरी येथील मतदार राजांनी सरपंचपदी भरघोस मतांनी निवडून दिले. (हा एक वयाचा व सालाचा योगायोग म्हणावा लागेल.)
दि. 18 डिसेंबर 2022 रोजी रविवारला बोरी (चा.) येथे मतदान झाले. 20 डिसेंबरला2022ला मतमोजणी झाली. शिंदे व भाजपा गटाचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सरपंच हा जनतेमधूनच निवडला पाहिजे असा शासन निर्णय झाला. त्यामुळे सरपंचपदी निवड ही जनतेमधून झाली. बोरी गावात एकूण मतदान 1156 पैकी 1071 मतदान झाले. त्यापैकी धनंजय दिगांबर माने इतर मागासप्रवर्ग मधून उभे होते.त्यांना 620 मत मिळाले. मताचा कौल देऊन जणू काही मतदार राजांनी धनंजय माने यांचे वय 23 व सन 2023 ला नवीन वर्षाची भेट ग्रामीण भागातून महत्त्वाची मानली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक तथा सरपंचपदी निवड केली. त्यावेळेस धनंजय माने युवा तरुण युवा नेतृत्व युवा शिक्षित युवा उद्योजक व युवा राजयोग यांनी बोरी येथील मतदार राजांचे खूप खूप आभार मानले.
सरपंच धनंजय माने यांना प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचा हक्क बजावता आला. प्रथम मतदान पहिल्याच उंबरठ्यावर यशाचे राजशिखर गाठता आले. हा एक धनंजयसाठी राजयोग म्हणावा लागेल. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सुद्धा सरपंच पदापासून राजकीय वाटचालीला सुरुवात केली.ते सरपंच मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री पदापर्यंत त्यांचा चढता आलेख उंचावत राहिला हे कोणीही विसरू शकत नाही. त्याप्रमाणे सहा महिन्यापूर्वी बोरी गावात ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक झाली. त्यामध्ये सोसायटीच्या सदस्यपदी सर्वोच्च मतांनी त्यांचा विजय झाला. थोडक्यात सांगावेसे वाटते आजची युवा तरुण मतदार पिढी ही बुजुर्ग लोकांना राजकारणापासून दूर जायला तयार नाही. त्यामुळे मतदारापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण होत आहे.
ज्याप्रमाणे बापाच्या चपला किंवा बूट मुलांच्या पायाला साजेसे होतात. त्यावेळेस बापाने विचार करायला पाहिजे. आपल्याजवळ जे कारभार आहे. ते मुलाकडे सोपवणे पण आजचा बाप मुलाकडे कारभार द्यायला तयार नाही. व तो कारभार मुलगा नाचक्की करून घेतो त्यावेळेस समाजात चर्चेला उधान येते. मला यामधून एकच सांगायचे आहे. प्रत्येकाने प्रवाहाबरोबर राहावे प्रवाहाच्या विरोधात जाणे सर्वांनाच कठीण आहे. थोडक्यात म्हणजे आजची तरुण पिढी ही तरुण राजकीय मंडळीला स्वीकारत आहे. व जे परिवर्तन किंवा बदल आहे. ते पूर्ण तरुण पिढीच विकास करू शकते.
धनंजय माने यांचे एक ते सात पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी. आठ ते दहा पर्यंत महात्मा फुले विद्यालय, उमरखेड अकरावी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड व बारावी सम्यकदृष्टी उच्चमाध्यमिक विद्यालय, मुळावा तर पदवी शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय, औरंगाबाद येथून (हॉटेल मॅनेजमेंटची) पदवी घेतली तर एम.ए. इंग्रजी (भारती महाविद्यालय, हादगाव) (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक) येथून घेतले. प्रथमता त्यांची विचारधारा नोकरी करणे नाही. स्वतंत्र उद्योगात त्यांना उंच भरारी घ्यावीशी वाटते. गेली तीन ते चार वर्षांपासून ते भुसार मालाचे व्यापार करतात सर्व कामे येथे शेतकरी हिताचे करतात शेतकरी मंडळीतील परिसरातील गावे ब्राह्मणगाव कोपरा माणकेश्वर चातारी परजना घारापुर पळसपुर बोरी येथील शेतकऱ्यांसोबत हिताचे संबंध आहेत. तर बोरी ते हिमायतनगर रोडवर मुख्य मार्गावर सरस्वती वेअर हाऊसची वास्तू उभी होत आहे. काही कालावधीतच या वास्तूचे उद्घाटन होईल. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना धान्य साठविण्याचा हेतूने हिताचा प्रश्न त्यांनी हाताळला त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. बोरी गावातील गावचा तर विकास होणार. पण त्याचबरोबर शेतकरी हिताचे म्हणजे सोयाबीन हरभरा गहू कापूस या मालाला चांगला भाव पैशाची हमी फसवेगिरी नाही. अशी शेतकरी वर्गाची भावना आहे.
धनंजय माने सरपंच यांचे पिताश्री शिक्षक तर आई गृहिणी व लाडका भाऊ डॉ. ऋषिकेश माने हे पुण्याला नांदेडसिटी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पुणे. येथे प्रॅक्टिस करतात.तर त्यांचे आजोबा स्वर्गीय चंपतराव संभाजी माने हे राजकीय कार्यकर्ते होते. त्यांना राजकारणाची भरपूर आवड होती. त्यांचा आशीर्वाद धनंजय यांना लाभला आहे. तर विशेषता उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. व प्रकाश पाटील देवसरकर यांचा या कुटुंबाला संपूर्णपणे स्टॅन्ड करण्यासाठी आधार मिळाला आहे.
बोरी गावात प्रथमच इतक्या लहान वयात सरपंच होण्याचा तथा विदर्भातून सुद्धा असा मान मिळणे हा योगायोग विरळच दिसतो. बोरी गावाने धनंजय माने यांना सन्मान दिला. या सन्मानाचा धनंजय माने नक्कीच सन्मान करतील. यात तिळमात्र ही शंका नाही. त्यामुळे उमरखेड तथा विदर्भात इतक्या कमी वयाच्या मुलाला सरपंचपद मिळाले याबद्दल विविध स्तरातून चर्चा होत होती. धनंजयने चांगले कर्तव्यदक्ष बोरी गावच्या हिताचे काम करावे. तर पुढे पुढे या युवा तरुणांना खूप मोठी संधी मिळेल असे आशीर्वाद पर लोक बोलत होते. हे विसरता येणार नाही. व विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर उमरखेड यांनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या…!













