


✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
गेवराई(दि.10जानेवारी):- तालुक्यातील तलवाडा येथील सर्व सामान्य व्यक्ति महत्व म्हणून गाव परिसरात परिचित आसलेले रामकिसन रंगनाथ बहिर उर्फ आर. आर. आबा यांना शालैय जिवना पासुन समाज सेवची आवड असुन वडिलोपार्जीत जेम तेम घरची शेती व रहात्या घरी एक छोटशे किराणा दुकान चालवत आर. आर. आबा सातत्याने गरजवंताच्या कामी पडतात. शालैय गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या काबाड कष्टाच्या पैशातुन नेहमीच शालैय साहित्याचे वाटप करुन थोड्याफार प्रमाणात का होईना ते समाज सेवेचा वसा जोपासतांना नेहमी दिसुन येतात.
रस्त्यात भेटना-या पायी चालना-या वाटसरुंचे वजन आसलेले साहित्य (सामान) वाटसरुसह घर पहोच करण्याच्या अनोख्या समाजसेवेत आर. आर. आबा कायम सक्रिय दिसुन येतात. या अफलातून जनसेवे मुळे ते गाव परिसरात सर्व परिचित असुन त्यांनी आता गरजवंताचा वेळ वाचवन्याहेतु बाजार पेठेतुन गॅस स्लेंडर थेट घर पहोच करण्याचा मानस हाती घेतला असुन त्यांची आर्थिक परिस्थिति ही जेमतेम आसल्याने गॅस स्लेंडर घर पहोच सेवेसाठी ते फक्त देणा-या कडुन विस रुपय समाज कार्यासाठीच देणगी स्वरुपात सविकारतात. त्याच्या या आनोख्या उपक्रमाचे गाव परिसरात कवतुक होत असुन त्यांना या अफलातून समाज सेवे बद्दल चांगला प्रतिसाद मिळत असुन ज्यांना कुणाला जेव्हा केव्हा गरज भासते ते आर. आर. आबांना संपर्क साधतात.













