Home महाराष्ट्र सुरज यादव यांना राजस्थान कोटा मध्ये राष्ट्रीय पुरस्कार

सुरज यादव यांना राजस्थान कोटा मध्ये राष्ट्रीय पुरस्कार

104

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगांव(दि.9जानेवारी):- येथील गौ-सेवा रक्तसेवा मध्ये अग्रेसर असलेले एकनिष्ठा फाऊंडेशन संस्थापक सुरज यादव यांना राष्ट्रीय पुरस्कार रक्तदान जिवनदान सेवा समिती कोटा, द्वारा समाजसेवी स्व. श्री सुनिल सुमन यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत राष्ट्रीय स्तर रक्तदान सम्मान समारोह शैक्षणिक व पर्यटन नगरी कोटा शहर मध्ये आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, उतराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, दिल्ली, उडीसा राज्यातून आलेल्या वेगवेगळ्या संस्थांच्या ५१ लोकांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विदर्भातील खामगांवचे सुपुत्र बुलढाणा जिल्ह्याचे रक्तदान व गौ-सेवासाठी कार्य करणारे एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांनी थैलीसिमिया पिडीत रूग्णांना व ईतर दुधर आजार ग्रस्त दिव्यांग रूग्णांना वेळेवर रक्ताची सेवा आर्थिकसेवा औषधोपचार व तसेच तपासणी साठी मदत करून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे ऑल इंडिया मध्ये कुठल्याही राज्यासह जिल्ह्यात मित्र मंडळीच्या व तेथील संस्थेत कार्य करणाऱ्या रक्त सेवकांच्या माध्यमातून सुरज यादव यांनी आता पर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान रक्तासोबत वैद्यकीय सेवा मिळवुन दिल्या बद्दल रक्तदान गौ-सेवेची जनजागृती करून लोकांमध्ये केल्यामुळे त्यांचा कोटा राजस्थान मध्ये दिनांक ६ रोजी भगवान श्री श्याम बाबा यांची प्रतिमा व सन्मान पत्र २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शासकीय रक्तपेढी शल्यचिकीत्सक श्रीराम रक्तपेढी व नागरिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अशी माहिती एकनिष्ठा फाऊंडेशन बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवम मानकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here