✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घूस(दि.7जानेवारी):-आपल्या लेखणीच्या बळावर शोषित वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे भ्रष्टाचारांचे पितळ उघडे पाडून लोकशाहीला बळकट करण्याचे कार्य हे पत्रकार बांधव करीत असतात.पत्रकार बांधवाच्य कार्याला सन्मान देण्याकरीता महाराष्ट्र शासनाने आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांबेकर यांच्या जन्मदिना निमीत 06 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो
आज दिनांक 06 जानेवारी रोजी शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात एका छोटेखानी कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे पत्रकार बांधवांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावणा ज्येष्ठ व माजी पत्रकार शामराव बोबडे यांनी केली.सदर कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार गजानन साखरकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश खडसे, मनोजकुमार कनकम, श्रीकांत माहुरकर,दयाशंकर तिवारी,हनिफ शेख,प्रणय कुमार बंडी, विक्की गुप्ता, संजय जिवनकर,नौशाद शेख,इम्तियाज रज्जाक,पंकज रामटेके,देवानंद ठाकरे,अरविंद चहांदे, यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,ज्येष्ठ नेते गुंडेटी, अलीम शेख,रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी,कपिल गोगला,कुमार रुद्रारप,विजय रेड्डी,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.