Home गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची भेट

115

🔹घंटानाद आंदोलनातील विविध मागण्यावर करण्यात आली चर्चा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6जानेवारी):-गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील नरभक्षक वाघाचा व जंगली हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी चंद्रपूर येथे घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातील मागण्या लक्षात घेऊन जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांना मागण्यांवर चर्चा करण्याकरिता आमंत्रित केले होते, या संदर्भाने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या शिष्टमंडळाने मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांची भेट घेतली व आंदोलनातील विविध मागण्यावर जवळपास तीन ते चार तास सविस्तर चर्चा झाली.

मात्र आंदोलनातील काही मागण्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुनगंटीवार यांच्या घरासमोर चंद्रपूर येथे 6 जानेवारी रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली.

आंदोलनातील प्रमुख मागण्या नरभक्षक वाघाचा आणि जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याबरोबर, त्यांच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबास विनाविलंब त्यात काळ आर्थिक मदत देणे, वनपट्ट्या संदर्भात प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे देणे, जंगलालगत असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सुरजागड येथे लायंड मेटल कंपनीकडून होणारे अवैध वृक्षतोडीची चौकशी, जिल्ह्यातील सागवान तस्करांवर कठोर कार्यवाही करणे, वन विभागातील रिक्त पदांची भरती, जिल्ह्यातील वनमजुरांवर लावण्यात आलेले खोटे आरोप रद्द करणे, वनावर आधारित लघु आणि कुटीर उद्योग निर्माण करणे, कमलापूर येथील हत्तीचे स्थलांतर थांबवून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती मागे प्रशिक्षित माऊत व चारा कटर नियुक्त करून कमलापूर आणि जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांचा विकास करणे, जंगल व्याप्त परिसरातील शेतांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना चैन फेन्सिंगची व्यवस्था करणे यास अनेक मागण्यांचे समावेश आहे.

सदर चर्चे करिता उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, काँग्रेस शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, सहकार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, भैय्याजी मुदमवार, जावेद खान, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here