Home चंद्रपूर ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

ने. ही. विद्यालय नवेगाव पांडव येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

108

✒️नागभीड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागभीड(दि.4 जानेवारी):-महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने वैज्ञानिक,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती ज्यांच्यामुळे झाली ती विद्येची देवता म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर त्याच्या जयंतीचा कार्यक्रम ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एस. ठाकरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून दीपा फुलझेले मॅडम सहायक शिक्षिका कोसंबी गवळी व माधवी कुळे मॅडम उपस्थित होते.

महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचाराला जाणले पाहिजे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारातूनच महिलांची प्रगती होऊ शकते असे मत दीपा फुलझेले मॅडम यांनी व्यक्त केले. माधवी कुळे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले .

आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एस. ठाकरे सर यांनी विद्येची खरी देवता ही सरस्वती नसून सावित्रीबाई फुले आहे असे अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषण व गीत गायन स्पर्धा व ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग 10 ची विद्यार्थिनी स्नेहा येवले व आभार ज्ञानेश्वरी हजारे केले .कार्यक्रमादरम्यान स्नेहसंमेलन निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण विद्यालयाचे शिक्षक म्हणजेच मुनिराज कुथे व रेवनाथ ठवरे यांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षक श्री. घनश्याम नीपाने, श्री. नरेंद्र चुर्हे, श्री सतिश डांगे,श्री. वेदप्रकाश बेदरे, श्री,मनोज हेमके,श्री.ललित महाजन, ,लिपिक शांताराम निकूरे,श्री. डबले, श्री. बंडू फुकट उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here