Home महाराष्ट्र कायद्याची चौकट कोणीही मोडता कामानाही कायदा सर्वसमान – बोरगावकर

कायद्याची चौकट कोणीही मोडता कामानाही कायदा सर्वसमान – बोरगावकर

103

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4जानेवारी):-कायदा सर्वासाठी समान आसुन यात भेदभाव वर्णभेद करता येणार नाही आज ही आनेकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने समाजात गंभीर गुन्हे घडत आसतात कायद्याची चौकट कोणास ही मोडता येणार नाही असे व्यक्तव्य पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केले.गंगाखेड परिसरातील गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या वसुंधरा बोरगावकर यांची गंगाखेड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद मॅट च्या आदेशानुसार गंगाखेड पोलिस निरिक्षक पदी नियुक्ती आदेश पोलिस अधिक्षकाने दिल्याने सोमवारी त्यांनी पोलिस ठाण्याचा पदभार घेतला आज पोलिस ठाण्यात घेण्यात आलेल्या पञकार परिषदेत पुढे बोलताना पोलिस निरिक्षक यांनी स्पष्ट केले महिलासह मुलींच्या संरक्षणासाठी पोलिस तत्पर आसुन येणाऱ्या काही दिवसातच शाळा काॕलेज या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहाणार आहे.

शहरातील अवैद्य धंदे पूर्णपणे बंद करण्यात येईल लाॕयन्स कल्बचा वतीने शहरात सीसीटिव्ही बसविण्यात येणार असून शहरात राञीची पोलिस गस्त काटेकोर पणे राबविण्यात येणार आहे.शहरात अवेद्य धंदे अथवा चुकीची कामे गुन्हे घडत असेल तर पञकारानी व नागरीकांनी तात्काळ मला फोन करावा पोलिस ठाण्याचा कर्मचारी चुकीचे कामे करत आसेल तर निर्भीड पणे सांगावे असे आव्हान ही पोलिस निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here