१) औरंगजेबाने जर धर्मासाठी युद्ध केलं असतं तर त्याने मुस्लिमच असलेल्या आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाही का संपवली? ती मुस्लिमांचीच म्हणून वाढवली का नाही? त्यांच्याविरोधात कारवाया का केल्या?
२)दुसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे जर संभाजी राजेंना ‘धर्म बदल नाहीतर जीव दे’ असं औरंगजेब म्हणाला असता तर संभाजी राजेंच्या मृत्यूनंतर तब्बल 30 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या संभाजीराजेंच्या पत्नी येसूबाई आणि 18 वर्ष कैदेत असलेले चिरंजीव शाहू राजे ह्यांना औरंगजेबाने धर्मांतराची बळजबरी का केली नाही?
सहज करू शकला असता, शाहू राजे तर वय वर्षे 7 ते वय वर्षे 25 पर्यंत कैदेत होते मग त्यांना जबरदस्तीने धर्मांतर का करायला लावले नाही? इतकी वर्षे औरंगजेबाच्या कैदेत राहून सुद्धा ते हिंदूच कसे राहिले?
✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666