✒️मूल(पुरोगामी न्युज नेटवर्क)
मुल(दि.3जानेवारी):-झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने मुल येथे सौ. मंगलाताई फुलचंद गोंगले यांच्या नीलपंख या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. पं.स. सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष कवयित्री सौ. रत्नमाला भोयर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. भाष्यकार म्हणून कवी अरुण झगडकर, तर अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर, कवयित्री सौ. शशिकला गावतुरे, फुलचंद गोंगले यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक सौ. मंगला गोंगले यांनी केले. या काव्य संग्रहातील काही रचना शालेय विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये शिकवणा-या आहे, असे मत सौ. रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले तर निलपंख मधील रचना नकारात्मक भाव बाजूला सारून सकारात्मक विचारांची पेरणी करणा-या आहे, असे अरूण झगडकर यांनी मत व्यक्त केले तर स्त्री जीवनाचे भावनिक विश्व रेखाटण्यात कवयित्री सौ. गोंगले ह्या यशस्वी झाल्याचे बंडोपंत बोढेकर यांनी म्हटले आहे. जिल्हा शाखेच्या वतीने गोंगले दाम्पत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रिताचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ कवयित्री सौ. शशिकला गावतुरे होत्या तर सुखदेव चौथाले, कवी संतोष मेश्राम, प्रब्रम्हानंद मडावी , यांची प्रमुख उपस्थिती होती.पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन परमानंद जेंगठे यांनी केले. उपेंद्र रोहनकर,प्रभा चौथाले,प्रब्रह्मानंद मडावी,नागेंद्र नेवारे,वर्षा भांडारकर,नेताजी सोयाम,प्रवीण चौधरी,प्रशांत भंडारे,सुरेश गेडाम,अमोल मेश्राम,मधुकर दुपारे,सत्तू भांडेकर,माणिक रामटेके,
संध्या देव्हारे यांनी दर्जेदार कविता सादर केल्या.कविसंमेलनाचे सूत्रसंचलन कवी परमानंद जेंगठे तर आभार वृंदा पगडपल्लीवार यांनी मानले.