Home महाराष्ट्र युवकांना मैदानी खेळासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करणार – अंबादास धुळे

युवकांना मैदानी खेळासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करणार – अंबादास धुळे

113

🔸तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा स्पर्धा संपन्न

✒️धनज प्रतिनिधी(अमोल जोगदंडे)

धनज(दि.2जानेवारी):-नेहरू युवा केंद्र यवतमाळ व अंबादास धुळे मित्रमंडळ धनज-मोहदरी यांच्या संयुक्त विद्यमाने धनज येथील आश्रम शाळेच्या मैदानावर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या नेहरू युवा केंद्र नेहमीच युवकांच्या विकासाचे विविध कार्यक्रम राबवत असतात त्यादृष्टीने युवक हे मोबाइल च्या दुनियेतून बाहेर यावे त्यांनी मैदानी खेळ खेळावे शारीरिक विकास व्हावा आणि युवकांनी समोर आपले भविष्य खेळात घडवावे आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे हाच उद्देश आहे या कार्यक्रमात कबड्डी सह गोळा फेक,लांब उडी,आणि 100 मीटर रंनिंग असे स्पर्धेचे स्वरूप ठेवण्यात आले होते.

सदर स्पर्धा वयोगट 18 ते 29 या युवकांसाठी च होत्या कबड्डी स्पर्धेत ऍग्री बॉईस या टीम ने प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक हा सावरगाव येथील युवकांनी मिळवला आणि तिसरा क्रमांक हा धनज येथील चमू नि पटकावला आहे सर्व विजेत्या स्पर्धकांना नेहरू युवा केंद्र यवतमाळ (खेळ मंत्रालय भारत सरकार) a तालुकास्तरीय ट्रॉफी,प्रमाणपत्र मेडल आणि रघुनाथ व्यवहारे राज्य राखीव पोलीस बल दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रति खेडाळू एक फळांचे रुक्ष भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटक माजी आमदार विजयराव खडसे,महाराष्ट्र कॉग्रेस कमिटी चे सरचिटणीस तातुभाऊ देशमुख,प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अंबादास धुळे,माजी जि. परिषद सदस्य रमेश चव्हाण, मनचक चव्हाण,निकेश गाडगे,चरण डोंगरे,नासेर देशमुख,पुरोगामी युवा ब्रिगेड चे शाहरुख पठाण सर,धनज येथील सरपंच वानीताताई देवानंद पाचपुते,उपसरपंच मुक्ताताई संजय झाडे,फकिरराव धनवे,आणाजी बोंबले,तातेराव भडंगे,प्रकाश आमले,शाळेचे मुख्याध्यापक सुनील डाखोरे,किशोर सोनटक्के,गाजनान वाले, शंकर डुकरे,अंजु चौधरी,विरेंन डोंगरे,सुधाकर खराटे, किसन पोटे,सचिन कांबळे,संग्राम गुव्हाडे,भोलानाथ नवघरे,राजु गायकवाड धनज,माधव धनवे, सदर कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे राजु गायकवाड यांनी केले होते सदर कार्यक्रम हा नेहरू युवा केंद्राचे जिल्हाधिकारी सारंग मेश्राम व अनिल डेंगे यांच्या मार्गदर्शनात पार पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here