Home महाराष्ट्र ग्राहकांनी आपल्या अधिकारा बाबत सावध व जागृत असने काळाजी गरज..!!

ग्राहकांनी आपल्या अधिकारा बाबत सावध व जागृत असने काळाजी गरज..!!

135

🔸व्ही. बी. कुळकर्णी जिल्हा न्यायाधीश
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
यवतमाळ(दि.26डिसेंबर):-जिल्हा विधिसेवा समिती व तालुका विधीसेवा समिती तसेच वकिल संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.०५ वाजता कोर्ट कॅन्टींग हॉल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश- १ पुसद तथा अध्यक्ष तालुका विधीसेवा समिती पुसदचे वसंत बी. कुलकर्णी हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन जी. एस. वरपे ५ वे सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पुसद तसेच मंचावर पुसद वकिल संघ बारचे अध्यक्ष मनोज घाडगे पाटील,आशिष देशमख व सचिव संजय राठोड हे उपस्थित झाले होते.

सदर कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम दिवाणी न्यायाधीश क स्तरचे वरपे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनासंबंधातून मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचे भाषणामध्ये त्यांनी ग्राहकांसाठी असलेल्या कायदयामधील तरतुदी तसेच ग्राहकांचे अधिकार कोर्ट फि स्टॅम्प बद्दल माहिती आणि वस्तुची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खरेदी करताना ग्राहकांना त्यांच्या जबाबदारीची आणि हक्कांची जाणीव होण्यासाठी तसेच फसवणुकीपासुन सावधान राहण्यासाठी जागतिक ग्राहक दिनाचे महत्व समजावुन सांगितले सध्या आधुनिक आणि डिजिटल जगात आपण वावरत आहोत. त्यामुळे आपण स्वतः सर्व वस्तुंच्या आणि सेवेच्या खरेदी बाबतीत शिक्षित असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाला ग्राहक हक्क प्राप्त असल्याने आपण काय विकत घेत आहोत त्याबद्दल जागरूक राहणे सहजशक्य आहे. असे मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ॲड.अंबिका जाधव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे तर आभार प्रदर्शन ॲड.श्वेता पांढरीपांडे यांनी केले. सदर कार्यक्रमास मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करणारे ॲड.महेश पाठक, ॲड. खराटे, ॲड.गरड, ॲड. गोपाल मस्के, ॲड. चोपडे, ॲड.यासीर सैयद, ॲड.अमोल भालेराव, ॲड. इमराण चव्हाण, ॲड.तनवीर खान, ॲड. संतोष खैरमोडे, ॲड.दारव्हेकर, ॲड.अभिजीत देशमुख, ॲड.सुशिला नरवाडे, ॲड. छाया देशमुख, ॲड. अश्विनी जाधव, ॲड. जयस्वार ॲड. सुचिता नरवाडे, ॲड. अश्विनी पवार तसेच अधिक्षक विलास बंगाले,पेठकर वरिष्ठ लिपीक, निलेश खसाळे, प्रणाली अधिकारी,प्रविण कोयरे, विजय गवारे, लिपीक न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार व पत्रकार, तसेच पोलीस कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here