🔸ग्रामपंचायत निवडणूक बोरी जयक्रांती विकास पॅनलचे दहा पैकी सरपंचासह सात उमेदवार विजयी तर तिन उमेदवार विरोधी गटाचे उच्च शिक्षीत 23 वर्षीय तरूणाच्या हातात बोरी ग्रामपंचायतचा बागडोर
✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)
उमरखेड(दि.22डिसेंबर):-राजकीय वर्चस्व सिध्द करणारी व अतिषय प्रतिष्ठेची समजली जाणा्रया तालुक्यातील बारा,अंबाळी,धानोरा व बोरी,ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाला नंतर विजय उमेदवारावर गुलालउधळला. बोरी (चा.)ग्रामपंचायतच्या सदस्य पदासह थेट संरपंच पदाच्या निवडणूकीचा निकाल मंगळवारी दुपारी दि. 20 डिसेंबर रोजी हाती आला.अतिषय अटी तटीच्या व चुरषीच्या ठरलेल्या निवडणूकीत बोरी(चा.)ग्रामस्थांनी धुरंधरांना हादरे देत जयक्रांती विकास पॅनलचे दहा पैकी सरपंचासह सात सदस्यांच्या गळयात विजयाची माळ टाकली.तर विरोधकाला तिन जागा काबीज करता आल्या.इ.मा.व. साठी आरक्षीत असलेल्या सरपंच पदावर 23 वर्षीय उच्च शिक्षित तरूण धनंजय दिगांबर माने यांनी 620 मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धुळ चारली.
शिवाजी अनंतराव माने यांनी मोठया फरकाने विजय मिळवीत 259 मते घेतली.अनु.जाती महिलेसाठी आरक्षीत असलेल्या प्रभागात सुलोचना रघुनाथ धुळे या महिला उमेदवारांनी निर्मला भिमराव रोकडे यांच्यावर 100 च्यावर मतांनी विजय संपादन केला.यशोदा रमेश वट्टवाड नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर यशोदा रमेश वट्टटवाड यांनी 260 मताधिक्य घेत प्रियंका दिपक वट्टवाड हिचा मोठया फरकाने पराजय केला.विजयी उमेदवारामध्ये अंकुश बाबाराव माने यांनी जयक्रांती विकास पॅनलचे सुदर्षन माने यांना अवघ्या चौदा मतांनी धुळ चारली.तर अनिता संजय माने यांचा सहा मतांनी निसटता विजय झाला.गणपतराव रामराव माने यांनी जयक्रांती विकास पॅनलच्या परमेश्वर
दिगांबर माने यांचा अवघ्या अकरा मतांनी पराजय केला.अनु.जाती सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत असलेल्या जागेवर माधव दगडू रोकडे यांनी 141 मते घेवून गाडगे चंपत भागाजी यांना मोठया फरकाने धुळ चारली.माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयक्रांती विकास पॅनलचे पॅनल प्रमुख तुकाराम माने,प्रकाश माने,दिगांबर माने,अशोक रोकडे,सुनिल रोकडे,हर्शवर्धन रोकडे,यांनी या निवडणूकीची मोर्चेबांधनीची धुरा खांद्यावर घेत सतत दहा वर्षे सत्तेत असणाÚया पुढाÚयांच्या बालेकिल्यांना सुरूंग लावत 23 वर्षाच्या उच्च शिक्षीत धनंजय माने या तरूणाच्या खांद्यावर गाव विकासाची धुरा सोपावली.
आपल्या बाजुने मतदारांना वळवित त्यांचे मतदान आपल्या झोळीत कसे पडेल यासाठी साम,दाम,दंड,भेद या नितीचा वापर करण्यात कोणतेच पक्ष अथवा पॅनल माघे पडले नाही.त्यांनी आश्वासने व प्रलोभने देत मतदारांना आकर्शीत करण्यासाठी ओल्या पाटर्यांच्या मेजवाणीचा प्रचारा दरम्यान गावात महापूर वाहिला.मात्र मतदारांनी जय क्रांती विकास पॅनलवर विष्वास दाखवत सहा सदस्यांसह सरपंच धनंजय माने यांना विजयीकरून ग्रामपंचायतची बागडोर एम.ए.इंग्रजी पदवी प्राप्त केलेल्या तरूणाच्या हातात गाव विकासाची सुत्रे दिली.