✒️पी.डी. पाटील सर(विशेष प्रतिनिधी)
धरणगांव(दि.20डिसेंबर):- तालुक्यातील वाकटुकी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती रामेश्वरी अरुण बडगुजर यांना त्यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक नवनवीन उपक्रमशीलता यांबद्दल ‘प्रोटान’ शिक्षक संघटनेचा “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षिका पुरस्कार” नुकताच जळगाव येथे जिल्हा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात आला.
या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी इजाज शेख साहेब, गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब, जे.डी.पाटील साहेब विस्ताराधिकारी, विजय पवार साहेब, प्रोटानचे राज्य उपाध्यक्ष गणेश काकडे, विभागीय उपाध्यक्ष महेंद्र तायडे, जिल्हा प्रभारी आनंद जाधव, कार्याध्यक्ष मुबारकशाह फकीर, जिल्हा सचिव अजय पाटील, यशराज निकम, जिल्हा उपाध्यक्ष सोपान भवरे, प्रशांत लवंगे व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मिलिंद भालेरावसर अध्यक्षस्थानी होते.
पुरस्कारार्थी बडगुजर मॅडम यांना धरणगाव गटशिक्षणाधिकारी श्री.रविकिरण बिऱ्हाडे साहेब, केंद्रप्रमुख कोकिळा आत्माराम जगदाळे मॅडम, श्री.स्वप्निल पाटील सर, सहकारी शिक्षक संभाजी शिवाजी बिराजदार सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल अब्दुल कलाम संघटनेचे अध्यक्ष श्री.फिरोज शेख सर आणि ‘प्रोटान’ जिल्हा महासचिव मिलिंद निकम सर यांनी अभिनंदन केले आहे. बडगुजर मॅडम यांनी वाकटूकी गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शाळेसाठी संगणक मिळविले आहे. परिसरातून कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.