🔸डिबी, पथक प्रमुखाचा वचक संपला- दुचाकी चोरांचा सुळसुळाट
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.18डिसेंबर):- येथील पंचायत समिती मध्ये ग्रामपंचायत निवडणुकिच्या प्रक्षिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.ग्रामपंचायत निवडणुक प्रशिक्षणा साठी प्रशासणाच्या वतीने पंचायत समीती कार्यालयात प्रशिक्षण घेण्यात आले होते या प्रशिक्षनासाठी तालुक्यातील शासकीय कर्मचार्यासह शिक्षकांना बोलवण्यात आले होते यावेळी प्रशासणाने चारचाकी, दुचाकी,गाड्याची पार्कग व्यवस्था केली होती परंतु त्याचे सोरक्षण रामभरोसे ठेवले होते यातच शिक्षक दिपक,देशपांडे, यांची शाईन गाडी क्र, MH 23,R,3688 रंग काळा लाल पंटा असलेली दुचाकी दि, 17 सायं 6,30 वा पंचायत समीती मधुन चोरीला गेली० आहे.
त्यामुळे चोरट्यां वरील पोलीसांचा धाक संपला असुन डि, बी पथक प्रमुख यांचा वचक राहिला नसल्याने दुचाकी चोरीच्या घटना दिवसे दिवस वाढत आहे.त्यामुळे अद्याप पर्यत चोरीला गेलेल्या दुचाकीचा बोटावर मोजण्या एवढ्या गाड्याचा अद्याप तपास लागला नाही त्यामुळे डिबी पथक प्रमुख करतात काय आसा प्रश्न नागरीकातुन विचारला जात आहे