Home धार्मिक  अमृत महोत्सवी श्री सेवागिरी यात्रेस मानाच्या झेंड्याने प्रारंभ , दहा दिवसांच्या काळात...

अमृत महोत्सवी श्री सेवागिरी यात्रेस मानाच्या झेंड्याने प्रारंभ , दहा दिवसांच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन

158

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

खटाव(दि.17डिसेंबर):-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र पुसेगाव ता. खटाव जि. सातारा येथील ब्रह्मलीन तपोनिधी सिद्धयोगी परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त भरवण्यात येणार वार्षिक यात्रेस आज शनिवार दिनांक १७ रोजी सकाळी नऊ वाजता मानाच्या झेंडा व पालखीने प्रारंभ झाला. आज सकाळी मानाचा झेंडा चे पूजन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, देवस्थानचे चेअरमन संतोष ( बाळासाहेब) मुगुटराव जाधव जाधव, विश्वस्त गौरव रायसिंग जाधव, संतोष गुलाबराव वाघ, सचिन देशमुख, डॉ.सुरेश सर्जेराव जाधव, रणधीर सुभाष जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

झेंडा पूजन करून देवस्थान मधून झेंडा वाजत गाजत मोठ्या उत्साहात यात्रा स्थळावर नेऊन विधिवत यात्रेला प्रारंभ करण्यात आला . यावेळी पुसेगाव मधील सर्व शाळा महाविद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लेझीम झांज पथक यामुळे झेंडा मिरवणुकीला रंगत आली.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गुजरात या राज्यांमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव, तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी 75 व्या पुण्यस्मरणार्थ शनिवार, दिनांक १७ डिसेंबर २०२२ ते ,२७ डिसेंबर 2022 दरम्यान भरणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.यात्रेत नावीन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी देवस्थान ट्रस्ट व विविध समित्यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत बुधवार दिनांक २२ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून त्या दिवशी रथोत्सव होणार आहे. अशी माहिती मठाधिपती सुंदरगिरी महारज चेअरमन संतोष ( बाळासाहेब) मुगुटराव जाधव, विश्वस्त गौरव रायसिंग जाधव, संतोष गुलाबराव वाघ, सचिन देशमुख, डॉ.सुरेश सर्जेराव जाधव, रणधीर सुभाष जाधव…

चौकट.
*शॉन शर्यती पुसेगाव पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल आहे दरम्यान 19/ 12/ 2012 रोजी होणाऱ्या श्वान शर्यती या महाराष्ट्रात अव्वल असणार असून त्यासाठी पुसेगाव पॅटर्नची तयारी करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी दिली तर भारत विरुद्ध इराण असा कुस्त्यांचा जंगी सामना दिनांक 21 रोजी होणार असल्याची माहिती विश्वस्त गौरव जाधव यांनी दिली*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here