✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.16 डिसेंबर):-महाराष्ट्र मध्ये सतत चालू असलेल्या महापुरुषांच्या बदनामी व त्यांच्यावर देशाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे उमरखेड शहरांमध्ये आज “जोडे मारो” आंदोलन वंचित बहुजन आघाडी राजकीय पक्ष त्याचबरोबर भिम टायगर सेना सामाजिक संघटना च्या वतीने जोडे मारो आंदोलनाचे आयोजन केले होते.
दुपारी 3 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
सदर “जोडे मारो” आंदोलन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविला आहे.जॉन्टीभाऊ विनकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जाहिर निषेध केला.
राज्यपाल भगतसिंग कोशारी व महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विषयी बदनामी कारक वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्यात यावा तसेच यापुढे महापुरुषाविषयी कोणी बदामी कारक विधाने करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर बंदोबस्त करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत माननीय महामहीम राष्ट्रपती महोदय यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड मार्फत निवेदन देण्यात आले.
“जोडे मारो” आंदोलनाचे आयोजक संतोषभाऊ जोगदंडे (तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी उमरखेड), सिद्धार्थ दिवेकर (पत्रकार/शहराध्यक्ष भिम टायगर सेना उमरखेड) यांनी केले होते.
या आंदोलनाला सहभागी म्हणून तडफदार कार्यकर्ते देवानंद पाईकराव (तालुका महासचिव), विष्णुकांत वाडेकर (तालुका उपाध्यक्ष) प्रफुल दिवेकर (युवा सामाजिक कार्यकर्ते), रवींद्र हापसे, सुधाकर कदम, संदीप विनकरे, नितीन आठवले, बुद्धभूषण इंगोले, बाबुराव नवसागरे, सादप कदम, अनिल जोगदंडे, सुमेध खंदारे, अरविंद सावते, अविनाश पाईकराव, कोंडबा वाहुळे, राहुल तपासे, राजेश घोगरे, आकाश कवडे इत्यादी अनेक तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी व भीम टायगर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.