✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)
खटाव(दि.15डिसेंबर):-तालुका खटाव जिल्हा सातारा येथील१९६५ साली कै माजी आमदार चंद्रहार पाटील यांनी सुरू केलेल्या खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात रविवार दि १८ रोजी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य अरविंद येलपले यांनी दिली.
तालुक्यातील गरजू आणि होतकरू मुलां-मुलींसाठी उच्च शिक्षणाची मोफत सोय व्हावी या उदात हेतूने १९६५ साली हे महाविद्यालय सुरु केले .शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कार आणि सुसंस्कृततेचा वारसा घेऊन गेल्या ५० वर्षात हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी आज जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत.
त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यरत असलेल्या क्षेत्रातील ज्ञानाचा या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लाभ व्हावा तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये भर पडावी ,यासाठी या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित केला आहे.तरी शहाजीराजे महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले आहे.