✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.15डिसेंबर):-तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने नफरत छोडो भारत जोडो यात्रा बाईक रॅली चिमुर येथुन महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे महासचिव मा.प्रा.राम राऊत सर आणि माजी जि. प. अध्यक्ष तथा 74 चिमुर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थित श्रीहरी बालाजी मंदिर पासुन सुरूवात करण्यात येत आहे. ही बाईक रॅली चिमुर ते कांपा पर्यंत आहे. कांपा येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. महेन्द्रा ब्राम्हणवाडे यांचा भव्य पैदल मोर्चा नागपुर विधानभवनावर जात असून या भव्य पैदल मोर्चाचे तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने स्वागत करण्यात येत आहे.
या महागाईचा आणि बेरोजगार शेतकरी ,शेतमजूर, शेतकऱ्यांना प्रति एकरी सानुग्रह 25 हजार रुपये वार्षिक मदत देण्यात यावी ,20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, पिक विमा धारकांच्या वैयक्तिक नुकसानीच्या तुलनेत नुकसान भरपाई देण्यात यावी. असे अनेक प्रश्न आहेत या करीता गडचिरोली ते नागपुर 175 की.मी. पैदल यात्रा दि. 14 डिसेंबर 2022 पासुन सुरूवात झालेली आहे. या यात्रेत शेतकरी, शेतमजूर,युवक,महिला , विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊया आणि काँग्रेस चे हात मजबूत करू या असे आव्हान तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील गावंडे यांनी केले आहे.