✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.14डिसेंबर):-जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिस कर्मचा-यांना पोष्टल मतदानासाठी आवश्यक असलेला फाॅर्म भरून घेण्यात आलेला नसल्यामुळे पोष्टल मतदान करता येईल की नाही तसेच मतदानाच्या हक्कापासुन वंचित राहण्याची शक्यता असुन संबधित प्रकरणात उपाययोजनांबाबत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री पोलीस महासंचालक यांना ईमेल द्वारे निवेदन दिल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि.१२ डिसेंबर रोजी संबधित तहसिल कार्यालयात पोष्टल मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याबद्दल पत्रक काढण्यात आले आहे त्यामुळे एकंदरीतच पोलीस बांधवांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सविस्तर माहीतीस्तव
___
बीड जिल्ह्य़ातील शेकडो पोलीस ग्रामपंचायत मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.१० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय आधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयात ईमेल द्वारे निवेदन दिल्यानंतर त्याची दखल घेत दि.१२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्र काढण्यात आले असून त्यामध्ये नमुद करण्यात आले आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीचा निवडणूक बंदोबस्त लागलेला आहे त्यांनी आपल्या हद्दीतील तहसिल कार्यालयात दि.१४ डिसेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज करावेत.
त्यानंतर तहसिल कार्यालयाला निवडणूक विभागामार्फत मतपत्रिकेचे लिफाफे प्रदान करण्यात येणार असून पोलीस बांधवांनी सदर लिफाफे दि.१९ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबधित तहसिल कार्यालयात पोहोच करावेत. तहसिल कार्यालयात मतदानाचे ड्राॅप बाॅक्स ठेवण्यात येणार त्यामुळेच बीड जिल्ह्य़ातील जवळपास ४००-५०० पोलीस बांधवांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.