Home बीड शेतकरी पुत्र गणेश फरताडेला गेवराई भूमिपुत्र भुषण पुरस्कार जाहीर

शेतकरी पुत्र गणेश फरताडेला गेवराई भूमिपुत्र भुषण पुरस्कार जाहीर

100

🔸गेवराई येथे छत्रपती फेस्टिवलमध्ये होणार शनिवारी विविध मान्यवरांच्या हस्ते वितरण

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.14डिसेंबर):-सोशल मिडियावर इंस्टाग्राम हे सध्या सर्वत्र गाजत असलेलं माध्यम आहे. विविध मनोरंजनात्मक व्हिडिओ इंस्टाग्राम वर सध्या अनेकांना भुरळ घालतात. मात्र याचा सदोपयोग करुन बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील भूमिपुत्र असलेला ऊसतोड कामगाराचा मुलगा गणेश अंकुशराव फरताडे हा युवक मात्र शेतकऱ्यांच दुःख आणि त्यावरील पर्याय इंस्टाग्रामच्या माध्यमातून मांडत आहे. लोकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर दोन ते दीड लाखाच्या वर फॉलोवर आणि लाखोंमध्ये लाईक अर्थातच पसंतीच्या बळावर तो सध्या सर्वत्र लोकप्रिय ठरुन शेतकऱ्यांसह तरुणांच्या मनावर तो सध्या अधिराज्य गाजवत आहे.याची दखल घेत छत्रपती परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती फेस्टिवल मध्ये सुप्रसिद्ध शिवचरित्रकार गणेश फरताडे याचा गेवराई भुषण पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शनिवारी गौरव करण्यात येणार आहे.

गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट कडून दि.१७ डिसेंबर २०२२ रोजी छत्रपती फेस्टिवल २०२२ चे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जि.प.कन्या शाळेच्या प्रागंणात आयोजन करण्यात आले. असून या कार्यक्रमास सुप्रसिध्द हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर महिला वर्गाचा आवडता कार्यक्रम क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत “होम मिनिस्टर”खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या वर्षी गेवराई भुषण व भुमिपुत्र भुषण असे दोन पुरस्कार वितरण करण्यात येतील.

छत्रपती उद्योग समूहातर्फे दरवर्षी दिला जाणारा “गेवराई भूषण” हा मानाचा पुरस्कार या वर्षी वृक्तवाने बीड जिल्ह्याचे नाव दिल्लीपर्यत गाजवणारे युवा अभ्यासक व प्रभावी वक्ते राहुल गिरी यांना देण्यात येणार असून भुमिपुत्र भुषण गेवराई तालुक्यातील शेतकरी पुत्र,टिकटाॅक तसेच इंस्टाग्राम स्टार गणेश फरताडे यांना देण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाचा गेवराईसह तालुक्यातील तमाम बंधू-भगिनींनी या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार आवर्जून उपस्थित रहावे.या महिला वर्गाच्या आवडत्या कार्यक्रमा दरम्यान महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली असल्याने जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन संतोष भंडारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here