Home बीड बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रात कलम 144 लागू – जिल्हादंडाधिकारी

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रात कलम 144 लागू – जिल्हादंडाधिकारी

139

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.14डिसेंबर):-जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडावी यासाठी निवडणुकीचे मतदान व मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात मतदानाच्या दिवशी 18 डिसेंबर 2022 आणि मतमोजणी 20 डिसेंबर 2022 या रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आली आहेत.

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी होणाऱ्या ठिकाणच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व अनधिकृत कृत्ये होऊ नयेत. याकरिता जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करून सदर आदेश केले आहेत.

या आदेशानुसार खालील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणे प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे आहेत. त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वाजवणे, मिरवणूक काढणे यावर प्रतिबंध करण्यात येत आहे. शासकीय वाहना व्यतिरिक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

सदर आदेश निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वगळून लागू राहतील. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम मयताच्या अंत्ययात्रेसाठी लागू राहणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत ग्रामपंचायतची नव्याने स्थापित ग्रामपंचायत इ तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाचा थेट सरपंच पदाच्या अशा सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या‌ सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडाव्यात तसेच कायदा व सुव्यास्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपयोजना करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान आणि दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी प्रक्रिया नि: पक्षपाती व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी या क्षेत्रात सीआरपीएस 144 (2) कलम लागू करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here