✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कारंजा(घा)(दि.14डिसेंबर):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा घाडगे येथील प्राचार्य डॉ.संजय पंजाबराव धनवटे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खुला प्रवर्गातून निवडून आल्या बद्दल त्यांचे व नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक विजय रामकृष्ण राघोरते हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ मध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून आल्या बद्दल पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दर पाच वर्षांने सिनेटच्या निवडणुका होत असतात.विशेष म्हणजे डॉ. धनवटे यांनी तिसऱ्यांदा सिनेट निवडणुकीत यश प्राप्त केले.स्वागत करतांना सामाजिक कार्यकर्ते रानासिंग बावरी,संभाजी ब्रिगेडचे युवानेते पियूष रेवतकर, शाम अग्रवाल, दिपक भालेराव,मयूर घागरे व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थीत होते.