✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.13डिसेंबर):-माळेवाडी तालुका भोर येथील भुमिपुत्र व मुंबई येथे व्यवसाया निमित्त स्थायिक असलेले युवा उद्योजक श्री नितीन शिंदे हे मुंबई येथे व्यवसाय करत असताना त्यांनी समाजातील विविध घटकांसाठी आजपर्यंत दिलेल्या योगदाणाची दखल सातासमुद्राच्यापार असलेल्या वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) या जागतिक संघटनेने घेतली आहे.जागतिक संघटना आहे या संघटनेच्या वतीने जे लोक जगासाठी आदर्श निर्माण करतात अशा विविध क्षेत्रातील अतिशय प्रामाणिक सेवा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील निवडक व्यक्तींना वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली व शुभ हस्ते श्री नितीन चंद्रकांत शिंदे यांना नुकताच श्रीरामपूर येथे “वर्ल्ड पालमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२२”ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराने माळेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. माळेवाडी भोर करांना हा जागतिक स्तरावरचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. म्हणूनच श्री नितीन शिंदे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जाते आहे. पुस्कारात महाराष्ट्राची शान व मानाचा फेटा मानपत्र, सन्मानचिन्ह, ट्रॉफी व पुरस्कारार्थी व्यक्तीस वर्ल्ड पार्लमेंटचे लाईफ टाईम्स मेंम्बरशिप देऊन सन्मानित करण्यात आले, वर्ल्ड पार्लमेंट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दत्ता विघावे सर यांच्या मार्गदर्शनातुन देण्यात आली.
यावेळी खजिनदार फिलीस टर्क (USA) वर्ल्ड पार्लमेंट उपाध्यक्ष प्रा नरसिंहा मूर्ती, दिल्ली चॅप्टरचे अध्यक्ष डॉ राकेश छोकर, महाराष्ट्र संपादक संघाचे अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ दत्ता विघावे प्रा. नागेश हुलावणे, प्रा अरुण सावंग, प्रा प्राची ब्राह्मणे प्रा अँड तेजल, पत्रकार श्री लुनेश्वर भालेराव आदी विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात करण्यात आले.श्री नितीन शिंदे यांच्या मानव सेविची विविध क्षेत्रातील संघटना,संस्थांनी व महान समाजसेवक व्यक्तींनी दखल घेऊन त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने व गौरव पत्राने सन्मानित केले आहे. ते माळेवाडी महुडे खुर्द या गावचे सुपुत्र असून सामाजिक कार्यकर्ते संदिप शिंदे यांचे लहान बंधू आहेत.श्री नितीन शिंदे यांच्या सामाजिक सेवेची दखल जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संघटनेने घेतली म्हणून त्यांचे सर्व स्त रावर कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
यावेळी बोलताना श्री नितीन शिंदे यांनी हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून आपले आई वडील सर्व मित्र परिवार पत्रकार बंधू तसेच मोठे बंधू श्री संदिप शिंदे तसेच संपूर्ण शिंदे परिवार याच बरोबर पत्रकार क्षेत्रातील गुरु, मार्गदर्शक श्री डी. टी. आंबेगावे सरांचा आहे.मला मार्गदर्शन केलेल्या ज्ञात अज्ञात अशा सगळयांचा मी आभारी आहे असे श्री नितीन शिंदे यांनी यावेळी सांगितले.