✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.9डिसेंबर):- स्थानीक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विदयार्थी कल्याण मंडळ तसेच सामाजिक न्याय विभागाच्या समानसंधी अतर्गत संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन करण्यात आले. यानिमिताने महाविद्यालयात समता सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिम्मित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते निबंध व गितगायन स्पर्धांचे आयोजन केले होते. बहुसंख्य विद्यार्थी वर्गाने प्रतिसाद दिला.
तसेच समता सप्ताहाची सांगता महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगीअध्यक्ष कार्यकारी प्राचार्य लेप्ट.डॉ. प्रफुल्ल बनसोड होतें. प्रमुख वक्ते डॉ. हरेश गजभिये व प्रा. कार्तिक पाटील होतें.या प्रसंगी रासेयो विभागीय समन्वयक प्रा.पिसे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा० राजुरवाडे प्रा.डॉ. कत्रोजवार ,प्रा० डॉ. कामडी प्रा. पोपटे डॉ. मेंढूलकर प्रा० वर्षा सोनटक्के उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा डॉ राहागंडाले यानी केले. आभार कु. जयश्री शिवरकर हिने मानले.