Home चंद्रपूर फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन

फेब्रुवारीत चंद्रपुरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन

85

🔸इको-प्रो संस्थेकडे यजमानपद, महाराष्ट्र पक्षिमित्र कडून घोषणा

🔹चंद्रपुरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7डिसेंबर):-यंदा राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे फेब्रुवारीत होणार असून, या संमेलनाचे यजमानपद इको-प्रो संस्थेकडे देण्यात आल्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वड़तकर आणि पदाधिकारी यांनी चंद्रपूरला भेट देत इको-प्रो कार्यालयात छोटेखानी बैठक घेत संमेलन आयोजन बाबत प्रारंभीक चर्चा केली.

इको-प्रो संस्था व महाराष्ट्र पक्षिमित्र च्या माध्यमातून ११ व १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात 35 वे राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात येत आहे, यासंदर्भात संमेलन आयोजन बाबत महाराष्ट्र पक्षिमित्र व इको-प्रो संस्थेचे पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली.

राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाच्या आयोजनासंदर्भात चंद्रपूर शहरात इको प्रो कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ जयंत वड़तकर, कार्यवाह प्रा. डॉ गजानन वाघ, किरण मोरे, सहा. संपादक पक्षिमित्र त्रैमासिक, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे, पर्यावरण विभाग प्रमुख, नितिन रामटेके, सचिन धोतरे, स्वप्निल मेश्राम व अॅड. राजमेहेर निशाने, सौरभ जवंजाळ आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील एका शहरात पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. पक्षी संवर्धन, जनजागृती, संशोधन, उपचार सेवा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा, यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संस्थेतर्फे पुरस्कार देखील देण्यात येत असतात. 1981 मध्ये सुरुवात झालेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र चळवळीत संस्थेच्या माध्यमातून मागील 42 वर्षात 34 राज्य स्तरीय व ३० पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे. यंदा 35 वे संमेलन चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा डॉ. जयंत वडतकर यांनी केली. यापूर्वी 2019 ला इको-प्रो संस्थेने 19 वे विदर्भस्तरीय पक्षिमित्र संमेलनाचे यशस्वी आयोजन केले होते. चंद्रपूर शहरात प्रथमच राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन होत असून ही मानाची बाब आहे.

चंद्रपूर येथे आयोजित होणाऱ्या संमेलनामध्ये इको प्रो संस्था प्रमुख आयोजक म्हणून राहणार असून, 11 व 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संमेलनाचे सोहळ्यात पुरस्कार वितरण, विविध मान्यवरांची व्याख्याने व सादरीकरणे, स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन पक्षी निरीक्षण कार्यक्रम, प्रगट मुलाखत, चित्रकला, छायाचित्र, रांगोळी स्पर्धा होणार असून, पर्यावरणपूरक विविध प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल राहणार आहेत.

बाबरी मस्जिद : महाध्वंस के तीस साल

इको-प्रो तर्फे आयोजित राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनबाबत लवकरच शहरातील स्थानिक पर्यावरण संस्था व पक्षीमित्र यांचेसोबत आयोजन संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे इको-प्रो पक्षी संरक्षण विभाग चे बंडू दुधे आणि हरीश मेश्राम यांनी कळविले आहे.

गुजरात चुनाव और ‘2002 का सबक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here