✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.7 डिसेंबर)गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेडचे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे निवासी विशेष शिबीर मौजे बिटरगाव (खुर्द) येथे दि. 6 /12 /2022 ते दि.12/ 12/ 2022 या दरम्यान सात दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.दि. 6/ 12/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर निवासी शिबीर उद्घाटनाचा कार्यक्रम थाटात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. माधवराव कदम हे होते तर उद्घाटक म्हणून उमरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री.सतीश दर्शनवाड साहेब हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बिटरगाव (खुर्द) च्या सरपंच सौ. गयाबाई लक्ष्मण शेवकर, पोलीस पाटील सौ. नंदाबाई बाबुराव नरवाडे श्री. प्रकाशराव नरवाडे (संचालक,आपला जीन प्रेस, उमरखेड) श्री. अरविंद जाधव केंद्रप्रमुख/मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिटरगाव (खुर्द) तसेच श्री. व्ही.बी. नरवाडे मुख्याध्यापक (नवी आबादी ),बिटरगावचे ग्रामसेवक, श्री. व्ही. एम. काकडे, तिवरंगचे सरपंच श्रीधर धोंगडे हे उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बी.यु.लाभशेटवार, प्रा. एन. डी.ठाकरे प्रा. ए.जे.सूर्यवंशी हजर होते. गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय, उमरखेडचे बिटरगाव (खुर्द) येथील निवासी विशेष शिबीर यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज,यवतमाळ संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.रामसाहेब देवसरकर, सचिव माननीय श्री. डॉ. यादवराव राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा.शिवप्रसाद एस.इंगळे, महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस.बी.भुतडा मॅडम, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. डी.एस.शिंदे हे परिश्रम घेत आहेत.
निवासी शिबीर उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जी.बी. जाधव यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवप्रसाद एस.इंगळे यांनी केले.
आयोजित शिबिरातील सर्व कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी प्रा.इंगळे यांनी केले.स्वागत गीत कु. ललिता देवराय व श्रुती लांबटीळे यांनी गायले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. बी. भुतडा यांनी केले.