✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 6 डिसेंबर):-विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहरातील स्थानिक गुजरी वार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय असो’ असा जयघोष देण्यात आला.
यावेळी ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिनखेडे, प्रा. श्याम करंबे, जीवन बागडे, नेताजी मेश्राम, प्रशांत डांगे, महेश पिलारे, राहुल भोयर आदी. पत्रकार बांधव उपस्थित होते